एकामागून एक द्विपदी वाचताना आपण एखादी कथा वाचत आहो, असे वाटले.  म्हणजे एका अर्थाने ती एकामागून एका कडव्यात उलगडत फुलत जाणारी (चांगली) कविता वाटली. गझलेत प्रत्येक द्विपदी एकेक स्वतंत्र कविता असते असे म्हणतात. मात्र ही एक अखंड (चांगली) कविता वाटली. अर्थात कविता/गझललेखनातली माझी जाण मर्यादित आहे.

तू ओठांनी निर्धाराने खूप लपवले
पण डोळ्यांना तुझा कधी ते जमले नाही

तू लपवलेस ऐवजी तू लपवले ... हे तितकेसे बरे वाटत नाही.

खूप लपवले निर्धाराने तव ओठांनी ... हे बरे वाटेल असे वाटते. 'तव' चालेल की नाही ही शंका होती पण वर तुम्ही 'जाहले' वापरला आहे, तेव्हा 'तव' चालेल असे वाटते.

वर काही द्विपदींमध्ये नाही ऐवजी नाहीत असावे असे म्हटले आहे. ते कठीण वाटते.

फार तर

मला कळेना का डोळे हे मिटले नाही ... ऐवजी ... मला कळेना का मी डोळे मिटले नाही ... असे काहीसे करता आले असते, असे वाटते.