गझल छान, सफाईदार, बोलती/बोलकी झाली आहे.

बघत राहिलो दूर तुला ठिपका होताना
मला कळेना का डोळे हे मिटले नाही
वाव्वा... सुरेख

आज अचानक अर्थ असा हा समोर आला
त्या धक्यातुन शब्द कधी सावरले नाही
वाव्वा...

अकस्मात डोळे भिजले
अर्थ लागले शब्दांचे
ह्या अस्मादिकांच्या द्विपदी आठवल्या.

पुन्हा एकदा तेच:
'भाव चिरपरिचित' असणे हा गझलेचा दोष असू शकत नाही. (इतर काव्यप्रकारांनाही हे लागू व्हावे) अगदी मीर आणि गालिब ह्यांच्या गझलांतही 'चिरपरिचत भाव' आणि 'कल्पना' आल्या आहेत. उदाहरणे शेकड्याने देता येतील. अशावेळी द्विपदीचा/शेराचा बोलण्याचा अंदाज, लहजा कसा आहे, हे बघायला हवे.  केवळ काय सांगितले आहे (वेगळेपणा आहे का वगैरे) हे बघण्यापेक्षा कसे सांगितले आहे हे देखील बघायला हवे, असे ह्या क्षेत्रातले मर्मज्ञ म्हणतात.