एकामागून एक द्विपदी वाचताना आपण एखादी कथा वाचत आहो, असे वाटले. म्हणजे
एका अर्थाने ती एकामागून एका कडव्यात उलगडत फुलत जाणारी (चांगली) कविता
वाटली. गझलेत प्रत्येक द्विपदी एकेक स्वतंत्र कविता असते असे म्हणतात.
मात्र ही एक अखंड (चांगली) कविता वाटली.
प्रत्येक द्विपदी स्वतंत्रपणे, रचनेपासून वेगळी करून वाचून पाहा. तिचा स्वतंत्रपणे आस्वाद घेताना कुठलाही खंड येत नसल्यास रचना गझल समजण्यास हरकत नाही.