एक्स्पायरीला प्रतिशब्द सुचवताना त्याच बरोबर एक्स्पायर, एक्स्पायरिंग, एक्स्पायर्ड अशा सर्व रूपांमध्ये त्यातल्या त्यात योग्य प्रकारे वापरता येईल असा शब्द हवा. नाहीतर मराठीत कायम असणे आणि होणे ह्या क्रियापदाची रूपे वापरत राहावे लागते.
उदा. समजा आपण एक्स्पायरीला निवर्तन असा शब्द घेतला.
तर निवर्तणारा, निवर्तलेला, निवर्तणे अशा विविध रुपात तो वापरता येईल.
ह्यासाठी अधिकाधिक क्रियापदे शोधण्यावर / निर्मिण्यावर भर द्यायला हवा असे वाटते.