स्पर्शून हृदया ह्या
स्पर्शून हृदया ह्या, प्रिया केलेस काय इशारे
फिरला हा मौसम, प्रिय भासे जग सारे
म्हणशील जर तू तर, मी जीवनभर गाऊ,
मी जीवनभर गाऊ
गीते तुझ्या बोलांवर, लिहीतच मी राहू,
लिहीतच मी राहू,
गीतांतून माझ्या, तुज शोधे जग सारे
ये तुझी ओटी मी, प्रेमाने भरून देऊ,
प्रेमाने भरून देऊ,
जगभरची तुजला खुशी, की मी बहाल करू,
की मी बहाल करू,
तूची माझे जीवन, सहारा जगण्याचा तू
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००८०७२४