उपीट(आम्ही उप्पीट म्हणतो!)चे सामान्यरूप उपट बरोबर वाटत नाही. ते उपिट(किंवा उप्पिट) असेच असले पाहिजे. मूळ शब्दांत बदल करताना विपरीत अर्थ टाळण्यासाठी उपिट करणेच योग्य. 'उपीटाने' अशुद्ध, कारण मराठीत उपान्त्यपूर्व अक्षर नेहमी ऱ्हस्वच असते. (अपवाद जोडशब्द--मीठभाकर, आईवडील इ. इ. )
मात्र पहिले अक्षर ऱ्हस्व असल्यास हा 'अ' आदेश विकल्पाने होतो.
पहिले अक्षर ऱ्हस्व असल्यास हा 'अ' आदेश विकल्पानेच नाही तर विवेकाने करावा.