एखाद लाट भेटते किनाऱ्याला तो चंदेरी क्षण
एखाद वाट भेटते क्षितीजाला तो सोनेरी क्षण
दरवळते फूल अचानक वळणावरती तो गंधित क्षण
सापडते उत्तर अकस्मात तो निर्मळ आनंदित क्षण
वा... वा...
गाणं छान जमलंय, प्रमोदराव. एखाद्या मालिकेचं शीर्षकगीतच जणू. :)
शुभेच्छा... येऊ द्या आणखी कविता.