अल्पसंख्य हे विशेषण.  अल्पसंख्य म्हणजे संख्येने कमी असलेला. भारतात पारशी अल्पसंख्य आहेत.   अल्पसंख्याक(नाम) म्हणजे संख्येने कमी असलेली माणसे. लोकसभेत शिवसेना एक अल्पसंख्याक पक्ष आहे(अल्पसंख्य नाही!).  त्यामुळे अनेकवचनात अल्पसंख्याकांचा प्रश्न असा प्रयोग होईल. अनुस्वार 'का'वर.

अकारान्त विशेषणांची अनेकवचनी रूपे होताना काही बदल होत नाही. धष्टपुष्ट माणूस/माणसे.  तसेच अल्पसंख्याक(वि) जात/जाती.