चित्रपट उद्योगाचे कार्पोरेटायझेशन होणे ही चांगलीच गोष्ट आहे. उत्तम प्रतिभा असणाऱ्या दिग्दर्शक / कलाकारांना भांडवलाच्या अभावी दळभद्री दर्जाची निर्मिती करायला लागण्यापेक्षा त्यांना घसघशीत आर्थिक पाठबळ मिळणे हे स्वागतार्हच. निवडलेले दिग्दर्शकही ज्यांच्याकडून अपेक्षा ठेवता येतील असे आहेत. दोनतीन प्रश्न उभे राहतात ते असेः
१. मनोरंजन या व्यवसायात (एबीसीएल च्या अपयशानंतर इतक्या वर्षांनीही) पूर्णपणे व्यावसायिकता आणणे आणि या व्यवसायातील सर्जनशीलता सांभाळूनही तो आर्थिकदृष्ट्या फायदेशीर बनवणे यासाठीची कौशल्ये - स्किलसेटस - आपल्याकडे उपलब्ध आहेत काय?
२. एखाद्या निर्मितीक्षम दिग्दर्शकाला अशा कार्पोरेट चौकटीत राहून किती मोकळेपणाने काम करता येईल? आणि व्यवसायाच्या नियमांत राहून जर विशिष्ट कालमर्यादेत एखादी निर्मिती करण्याचे त्याच्यावर बंधन असेल तर त्या दिग्दर्शकाला त्याची गुणवत्ता टिकवून ठेवता येईल काय? (रामगोपाल वर्माचे उदाहरण या बाबतीत पुरेसे आहे)