एक्स्पायरीला प्रतिशब्द सुचवताना त्याच बरोबर एक्स्पायर, एक्स्पायरिंग, एक्स्पायर्ड अशा सर्व रूपांमध्ये त्यातल्या त्यात योग्य प्रकारे वापरता येईल असा शब्द हवा. नाहीतर मराठीत कायम असणे आणि होणे ह्या क्रियापदाची रूपे वापरत राहावे लागते.

उदा. समजा आपण एक्स्पायरीला निवर्तन असा शब्द घेतला.

तर निवर्तणारा, निवर्तलेला, निवर्तणे अशा विविध रुपात तो वापरता येईल.

ह्यासाठी अधिकाधिक क्रियापदे शोधण्यावर / निर्मिण्यावर भर द्यायला हवा असे वाटते.

प्रतिशब्द सुचवताना कुठल्या बाबींची काळजी घ्यायला हवी ह्याबद्दल योग्य दिशा दाखवणारा प्रतिसाद.
'पेटंट निवर्तल्यावर', 'निवर्तलेल्या पेटंटवर..', 'पेटंट निवर्तण्याआधी' ह्या शब्दप्रयोगांत 'निवर्तणे' चपखल वाटते आहे.