सर्जनच्या विरुद्ध विसर्जन हे बरोबर वाटते. मात्र विसर्जन ह्याचा अर्थ बुडवणे किंवा खाली जाणे/नेणे असाच केवळ नव्हे. (कदाचित गणपतिविसर्जनामुळे तसे वाटत असावे.) सर्जन म्हणजे निर्माण करणे. विसर्जन म्हणजे नष्ट करणे संपवणे. सैन्यात (माझा अनुभव एनसीसीचा) परेड संपताना, किंवा शाळेत शारीरिक शिक्षणाचा कालावधी संपताना विसर्जन (डिस्पर्स? ) अशी आज्ञा असते. (ती विसऽऽऽर् - जन् अशी सैन्याच्या थाटात दिली जाते!)

तेव्हा विसर्जन हे संपवणे ह्या अर्थाने वापरत असावेत असे वाटते. चू. भू. द्या. घ्या.