हा हा हा !!!

हा लेख वाचून एक जुनी आठवण जागी झाली.

आम्ही एकदा नाशिकला संस्कृत शिबिरात जमलो होतो.  त्यात मुले पक्की चहाबाज होती 
आणि बऱ्याचश्या मुली मात्र कॉफी पिणाऱ्या होत्या.  

त्यामुळे दहाही दिवस मुले विरुद्ध मुली असा सामना रंगत असे.  मुली संख्येने कमी 
असल्यामुळे सर्व भर "आवाजी मतदानावर" असे.

म्हणून आम्ही काही जबरदस्त घोषणा तयार केल्या होत्या.  

चायपानं विषपानं काफीपानम् अमृततुल्यम् ।

चायपानं मृत्तिकापानं काफीपानं मधुरपानम् ।

अजुनही बऱ्याच घोषणा होत्या पण त्या आठवत नाहीत. मात्र आजही त्या शिबिरातील मुले 
मुली भेटल्या की आम्ही हटकून हा विषय काढतो आणि नंतर पोटभर हसतो.