मालक व नायक या शब्दांची अभ्यासक या शब्दा बरोबर केलेली तुलना योग्य नाहीये.
मुळातच नायक चे नायिका होते तसे अभ्यासक चे अभ्यासिका होऊ शकते आणि अभ्यास
स्थळाला अभ्यासकक्ष म्हणता येईल कारण संस्कृतमध्ये इक प्रत्यय आहे मात्र मालक चे
मालकीण होते कारण मालक (मूळ उर्दू शब्द मालिक) हा शब्द संस्कृतोद्भव नसल्यामुळे
त्याला इक प्रत्यय लावावाच असे बंधन नाही.