एकंदर  छान साफ प्रासादिक गझल झाली आहे. मतल्याने सुरुवात चांगली झाली आहे. प्रत्येक द्विपदीतली दुसरी ओळ चांगली आहे.


लाख झाल्या वेदना अन लाख केल्या प्रार्थना ही
या बळीचे दुःख कोठे जाणतो हा पावसाळा
वा.. ही द्विपदी फार फार आवडली वरची ओळ लाख झाल्या वेदना ह्या प्रार्थनाही लाख केल्या अशी वाचून बघितली.

संपण्याची वेळ येते शेवटी जेव्हा ऋतूची
अमृताचे थेंब तेव्हा टाकतो हा पावसाळा

कुठला ऋतू? हिवाळा, उन्हाळा की पावसाळा? स्पष्ट व्हायला हवे.