गोपाल टी हाऊस पारोळा रोडवरच आहे. पारोळा रोड आणि आग्रा रोड (जुना) गावांत जिथं एकमेकांना भेटतात तिथंय. (महा)नगरपालिकेपासून अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर. काय पण चहा असायचा तो? अलीकडे बऱ्याच काळात तिथं जाणं झालं नाहीये. धुळ्यात गेलो तरीही. हल्लीही तसा असतो का? एकेकाळी संध्याकाळच्या चहासाठी तिथंच जायचो. कुणालचा मात्र ठाऊक नाही. आत्ता गेल्यावर पाहावा लागेल.
धुळ्यात कलाकंदचा आस्वाद घ्या कधी गेलात तर.

तिथं आणखीही बरंच काही आहे. गावाच्या पूर्व-पश्चिम, दक्षिण-उत्तरेच्या दिशेने बाहेर पडलं की जे धाबे लागतात तिथं या गोष्टी मिळतात. खास मांसाहारी. काही शाकाहारीही (पापड कुचुंबर आठवतंय, ताकदेखील). हल्ली ते गाव खूप बदललंय पण.
बघा एका चहानं किती आठवणी जाग्या केल्या.