पाठ फिरविली तिने जरी माधुरी प्रमाणे
केस मोकळे हाय सोडले पाठीमागे
लाडिक हसुनी मला आपल्या घरीच नेले
अन गेल्यावर श्वान सोडले पाठीमागे
अवांतर :
कवितेच्या प्रातांत कच्चा मालाचा पुरवठा करणारे स्वतःच पक्क्या मालाच्या बाजारात पाय ठेवायला लागले आहेत, असे दिसते. मार्केटिंगच्या भाषेत ह्याला बहुधा "फॉरवर्ड इंटिंग्रेशन" म्हणतात असे वाटते. काही तसेच काही पक्का माल बनविणारेसुद्धा स्वतःच कच्चा माल बनवतात असेही दिसते. हे बॅकवर्ड इंटिंग्रेशनचे उदाहरण असावे. चूभूद्याघ्या.