अधिक पैसा आल्यावर चित्रपटांचा दर्जा वाढेल अशी आशा करायला हरकत नाही. उदा. स्पेशल इफेक्टस हॉलीवूडच्या तोडीचे व्हायला हरकत नाही. अन्यथा राकेश रोशन सायन्स फिक्शनच्या नावाखाली जे काही करतो, त्यातले स्पेशल इफेक्टस पाहून कीव येते. अर्थात यामुळे चित्रपट चांगला होईलच असे नाही. तिकडेही बरेचदा पोत्याने पैसे ओतूनही चित्रपटात कथा, अभिनय वगैरेंच्या नावाने बोंबच असते. पण याचबरोबर बघायलाच हवेत असे उत्कृष्ट चित्रपटही निघतात.
एकूणात बॉलीवूडला जागतिक स्तरावर अधिक महत्त्व प्राप्त होईल असे दिसते आहे. दिग्दर्शकांची यादीही प्रॉमिसिंग वाटते आहे.
हॅम्लेट