केवळ अग्र म्हणजे जरी सर्वात पुढचे टोक अस काहीसा अर्थ असला तरी केवळ तेवढ्याच अर्थाने तो वापरला जातो असे वाटत नाही.

अग्रतः = अगोदर(च्या पानावर)... पृष्ठतः = पुढच्या (पानावर)

किंवा

अग्रज = अगोदर जन्मलेला = मोठा भाऊ

ह्यांमध्ये अग्र चा अर्थ केवळ सर्वात आधीचा असाच न घेता अगोदरचा असाही घेतला जातो असे वाटते. त्यामुळे त्या अर्थाने प्रायॉरिटीला अग्रक्रम हा शब्द योग्य वाटतो.

उलट प्राधान्य ह्या शब्दात श्रेष्ठता, उच्चनीचता सुचवली जाते. प्रायॉरिटीत केवळ कालक्रम सूचित करायचा असल्याने प्राधान्यक्रम हा शब्द तितकासा योग्य आहे असे मला वाटत नाही.