कविता आवडली.
काही शब्द, शब्दसमूह कवितेतून वगळल्यास वाचताना मला अधिक मजा येते आहे. काही ठिकाणी थोडा रंग भरता आला असते असे वाटते.
एक सरोवर दोन डोळ्यांचे
नितळ, पारदर्शी
तरीही गूढ, अथांग
मासोळ्या लहान-मोठ्या विचारांच्या
दिसल्या न दिसल्याशा
पापणी लवताच नाहीशा होणाऱ्या
आणि मी काठावर
गळ टाकून बसलेलो
पाण्यात प्रतिबिंबांचा कॅलिडोस्कोप
चंचल, क्षणाक्षणाला बदलणारा
ज्यातून मासोळ्या सळसळत जातात
चपळाईने, निरुद्देश, निर्हेतुक
भूत, वर्तमान, भविष्याला सारख्याच छेदत
गळ रिकामाच
दिवस मावळतीला लागतो
रुपेरी, सोनेरी मासोळ्या काळवंडू लागतात
मिसळू लागतात, गोंधळून टाकतात
गिळू लागतात
एकमेकांना...̱गळाला... मला...
एक सरोवर दोन डोळ्यांचे...