भारत आधी खूप चांगला होता असे मला तरी वाटत नाही. ब्रिटीशांमुळे या भूभागाला भारत हा एक देश असल्याचा एक साक्षात्कार झाला. त्यांचे राज्य येण्यापूर्वी शेकडो संस्थानांमध्ये पसरलेला हा भूभाग देश असा कधीच नव्हता. नंतर हा देश झाला. आदर्शवाद अधिक दिवस टिकले नाहीत आणि सध्याची भीषण अवस्था आली आहे. कोणालाच देशासाठी म्हणा किंवा समाजासाठी काही करायला नकोय. शाडूच्या मातीचे गणपती करावेत असा विचार पुढे आला तर शाडूच्या मातीच्या व्यापाऱ्यांनी अडवणूक सुरू केलीय. मुंबईत खड्डे बुजवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञात वापरायला कंत्राटदार विरोध करत आहेत. राजकारण्यांनी केलेला खेळखंडोबा विचारायलाच नको, तो विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी दिसलाच.

कसली संस्कृती नि कसलं काय?

देवही या देशाचे भले करेल असे वाटत नाही. कारण त्याने तसेही कधी भले केलेले नाही.नाहीतर सततच्या परकीय आक्रमणांनी हा देश पोखरला गेला नसता.  

पण कविता खूप छान आहे.