असे असताना आपण भारतीयांना रंगभेद, वर्णभेद ह्या विषयी बोलायचा नैतिक अधिकार
उरला आहे का?
नक्कीच नाही असेच म्हणावे लागेल. माझ्या मित्राचा अनुभव सांगावासा वाटतो. तो प्लास्टिक बनविणार्या एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करतो. रेल्वे, तसेच बजाज, श्कोडा ह्या कंपन्यासारख्या कंपन्यांना ही कंपनी वेगवेगळ्या प्रकारचे प्लास्टिकचे साबुदाणे विकते. ग्राहकांशी 'डील' कंपनीचे भारतीय कर्मचारी करीत असले तरी 'डील' 'सील' करायला त्यांना 'व्हाइट स्किन इफेक्ट' द्यावा लागतो आणि युरोपातून 'जॅक', 'टॉम', 'रु़डॉल्फ' ह्या कामासाठी खास येतात. पांढरी कातडी बघितली की भारतीय ग्राहक करारावर सही करताना फार झाकझिक करत नाहीत म्हणे.