आतंकवादासारख्या विषयावर भावनेच्या भरात नव्हे, तर अभ्यास करून माहितीपूर्ण लेख लिहिणं तुम्ही निवडलंत यासाठी त्रिवार अभिनंदन.
आय एस आयचा जन्म हा 'भारतात येने केन प्रकारेण अस्थिरता निर्माण करण्यासाठी उचापती करणारं एक संयंत्र नि वेळप्रसंगी छुप्या युद्धात काही नामुष्कीकारक प्रसंग पाकिस्तानवर ओढवला तर सहज बळीचा बकरा म्हणून पुढे करता येण्याजोगं प्यादं' याच कारणाने पाकिस्तानात झालेला आहे. यासाठी आवश्यक द्रव्य पुरवठा पाकिस्तानच्या खजिन्यातून होत असला तरी ती तरतूद तिथे करण्यासाठी अमेरिका, चीनकडून सक्रीय मदत होत असेल असं गृहित धरायलाही वाव आहे.
पण हे झाले बाहेरचे शत्रू. त्यांच्याशी लढणं एकवेळ सोपं असेल, पण आपल्याकडे झालेल्या ताज्या बॉंबकांडातला 'स्थानिक हात' हा जास्त बेजार करणारा आहे. तर याबाबत जास्त काही लिहिता येईल का? 
 
संतोष, तुम्ही हा विषय मनोगतावर आणला आहे. उत्तम! - पण ...
मनोगतावर राष्ट्रीय आशयाच्या चर्चा फार उत्साहाने चालत नाहीत; नि चालल्या तरी त्या तिरक्या तिरक्या जाऊन भलत्याच किनाऱ्याला लागतात असं माझं प्राथमिक मत आहे. ते जर चुकीचं असेल / वा या चर्चेत चुकीचं ठरलं तर आनंदच वाटेल.