आपले मत काहीही असो, आपण जर पुण्यात असाल आणि आपणास वेळ मिळत असेल तर अवश्य हजेरी लावावी. शेवटी दुसऱ्याची बाजू ऐकून घेणे हेही महत्वाचे असतेच.
शुद्धलेखनासाठी प्रमाणित साहित्याचा विचार करायला हवा. उदा. वर्तमानपत्रातले लेखन, कविता, काव्य, लेख इत्यादी. या लेखनातही अनेक चुका होत असतात. त्या टाळण्याचा प्रयत्न करावयास हवा.
या कार्यक्रमानंतर शुद्धलेखन आणि प्रचलित काव्यवाचन इत्यादी करण्याचा विचार आहे. तसे काव्यासाठी शुद्धलेखनाचा विचार काटेकोरपणे केला जात नाही.
शेवटी मराठीचे पाऊल पुढे पडावे हीच आपणासर्वांची इच्छा आहे, हे खरे आहे ना?
द्वारकानाथ कलंत्री