"बदन पे सितारें लपेटे हुए
 ओ जाने-ए-तमन्ना किधर जा रही हो"

टवाळ महाशय,
भाषांतर सुंदर झाले आहे. फक्त दोन ठिकाणी किरकोळ चुका दिसतात.

१) "कोई देखनेवाला आशिक तो हो"
ह्या ओळीच्या भाषांतरात "रसिक" शब्द खटकतो. 'आशिक' साठी 'प्रेमी' /'प्रेमिक'/'प्रियकर' हे योग्य प्रतिशब्द उपलब्ध असताना मोठ्या आवाक्याचा 'रसिक' का?

२)"मुहब्बत की ये इंतहा हो गयी"
 'मुहब्बत की इंतहा' चा अर्थ प्रेमाची/प्रीतिची परीक्षा नसून 'प्रेमाची पराकाष्ठा/परिसीमा' असा आहे (तुला धुंदीत देव म्हटलं ही प्रेमाची पराकाष्ठा झाली)