मिलिंद,

तुम्ही वर 'लोकमान्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने' लिहिलंय ते मी आधी पाहिलंच नाही आणि गझल वाचताना तरीही काल १ ऑगस्ट झाल्याची आठवण झाली. वाचताना पदोपदी टिळकांच्या पुतळ्याची (कुसुमाग्रज) आठवणही झाली.

विझल्या चिता, विझले विचारांचे दिवे
उरल्यात पोथ्या आणि चर्पटपंजरी..... वा!

दुबळे न ते, नि:शस्त्र ते होते जरी
तळहात होता, शीर होते त्यावरी - हा मतलाही अप्रतिम.

- कुमार