निम्म्याने तरी आपण ह्या कृष्णवर्णीय अमेरिकन, आफ्रिकन आणि आशियायी पर्यटकांना एक व्यक्ती म्हणून किंमत
देतो का?
तुमचे म्हणणे खरे आहे फक्त वरिष्ठ पातळीवरील राजकीय मुखवटाबाज गरजेने आणि अशा वृत्तीचे पुरावे देणे अवघड असते म्हणून बाकी सर्वसाधारण भारतीयांचा एकंदरच दृष्टिकोन आणि वृत्ती ही कृष्णवर्णीयांबद्दल रंगभेदीच आहे. विरोधाभास हा सुद्धाकी वर्णाने काळा भारतीय सुद्धा इतर देशातील कृष्णवर्णीयांना हिणवताना दिसतो किंवा स्वतःला त्यांच्या पेक्षा श्रेष्ठ समजतो , आफ्रिकेत असलेले भारतीयसुद्धा या वृत्तीचे गुलाम आहेत.
स्वतः परदेशी कृष्णवर्णीय असाच रंगभेद भारतीयांशी पाळतात का आणि युरोपीय गोऱ्यांना अधिक महत्त्व देतात का? युरोपीय गोरे पण रंगभेद करत असले तरी सामाजिक जीवनात कृष्णवर्णीयांशी भारतीयांपेक्षा अधिक मोकळेपणाने समरस होताना दिसतात तेव्हा कृष्णवर्णीय लोकांना पण युरोपीय गोऱ्यांविषयी अधिक जिव्हाळा वाटत असेल तर नवल नाही.
पण कोणत्याही कारणाने वर्णभेद करणे चूक आहे आणि हा दुटप्पीपण आमचे वास्तव आहे हे निश्चित