एका भारतीय डॉक्टरने अमेरिकेत एक अभिनव वैद्यकी उपकरण बनवणारी कंपनी काढली.त्याच्या कंपनीत काम करणाऱ्या एका दुय्यम अधिकाऱ्याला (आपल्या नोकराला) घेऊन तो गेल्या वर्षी कॉंफरन्ससाठी भारतात आला होता. येथील डॉक्टर्सनी त्या नोकराचे मालकापेक्षा जास्त आदराने स्वागत केले आणि त्यामुळे तो नोकरच वरमून गेला.
कारण तो नोकर गोऱ्या कातडीचा होता, त्याच्या मालकापेक्षा १ फूट उंच होता आणि अगम्य उच्चारात इंग्रजी बोलत होता.
आम्ही या प्रकाराला 'जानराव सिंड्रोम' म्हणतो आणि आपणही एखाद्या जॉनला भाड्याने ठेवावे असा विचार करत आहोत...