खानावळीतील(चुकले हॉटेलातील) वाढप्याला टिप देणे ही पाश्चात्य प्रथा आहे. साधारण मागवलेला पदार्थ वेळेवर आणून दिला तर टिप ठेवायला हरकत नसते सो मी टिप ठेवली. पण ती टिप ही दानाप्रमाणे असावी असं माझं मत आहे. देणारा आणि घेणारा यांच्याव्यतिरिक्त ती इतर कोणाला न कळण्यातच गंमत आहे. त्यामुळे टिप दिली तरी वाढपी मंडळींवरचा माझा राग मात्र अजून गेलेला नाही.