लोकसत्तेतील परीक्षण कादंबरी वाचण्याची उत्सुकता निर्माण करू शकते असे असले तरी त्या कादंबरीला पूर्ण न्याय देणारे नाही असे आमचे मत आहे. कादंबरीचा विषय "हा साप पकडण्याचा उद्योग करणे सोपे नसते" अशाच धर्तीचा आहे.
लोकसंघटनांमध्ये असणारी दिशाहीनता, स्वार्थ अशा भौतिक -सांघिक भावनांपलिकडे असणारे भावनिक नात्याचे हळुवार पदर उलगडण्यात ही कादंबरी यशस्वी ठरली आहे. सचोटी, नितिमत्ता, व्यवहार याचा योग्य संगम असणारे धर्माचे व्यक्तीमत्व या कादंबरीचा गाभा आहे. संघटनांमध्ये एकत्र काम करतांना स्त्री पुरुषांमध्ये निर्माण होणारे मैत्रीचे नाते, संघटनेचे ध्येय आणि राजकारणामुळे झालेला परिणाम यातला तिढा उत्तम प्रकारे हाताळला आहे. कादंबरीचा शेवट जवळ येतांना वाचकाच्या अपेक्षा अधिक वाढतात आणि कादंबरी संपते हे नाईलाजाने नमूद करावेसे वाटते.
श्रावण मोडक यांचे अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा.
सामाजिक संस्थांमध्ये हातभार लावणाऱ्या मंडळींनी जो विषय ऐरणीवर घेतांना अनेकदा विचार केला किंवा त्यापासून पळण्याचा प्रयत्न केला असा तिढा मोडकांनी सोडवला आहे! ( ते मोडक म्हणजेच मनोगती मोडक ही माहिती नवीन आहे. )