प्रशासक, चित्र लहान आकाराचे करून दिल्याबद्दल आभार.

चक्रधर१, हेमंत पाटील, प्रतिसादाबद्दल मनापासून आभार. साबुदाणा भिजत घालताना त्याचे प्रमाण त्याच्या दर्जावरून ठरवावे. काही साबुदाण्यांना कमी पाणी लागते तर काहींना जास्त. साबुदाणे जर अजिबातच चांगले नसतील तर पाणी कमी घाला अथवा जास्त, काहीच फरक पडत नाही. त्यामुळे साबुदाणे विकत आणल्यावर अगदी थोड्या प्रमाणात भिजत घालून त्याच्या प्रतीचा अंदाज घ्यावा. इथे अमेरिकेत भारतीय दुकानात मिळणारे साबुदाणे अजिबात चांगले नसतात. सर्व प्रकारचे वापरून पाहिल्यावर त्यातल्या त्यात 'स्वाद' चा साबुदाणा मला चांगला वाटला. बाकी लाल तिखट, जिरे, कोथिंबीर व नारळ उपवासाला चालतात. अर्थात उपवासाला काय चालते व काय नाही यातही बरीच मते आहेत.