हा बेल्जिअन बरोबर असताना मी पण टिप दिली मात्र ती इतर वेळेला जेव्हढी ठेवतो तितकीच आणि उपाहारगृह
पण असे फर्मास निवडले होते की तो लुंगी लावलेले वाढपी पाहून चाट झाला. शेवटी स्वच्छता आणि स्वादिष्टपणा
महत्वाचा, उपाहारगृहाची सजावट नव्हे.
तो आता माझ्याबरोबर राहून "भारतात भारतीयांप्रमाणे" ही इंग्रजी अर्थाची म्हण आचरणात आणायला
शिकलेला आहे. बाटलीबंद पाणी वैगरे खुळचट गोष्टी मी त्याच्या डोक्यातून पूर्ण काढून टाकल्या. तसेच मुंबईत
गेटवे, एलिफंटा वैगरे न दाखवता भा. दा. ला. संग्रहालय इ. दाखवले कारण तिच खरी मुंबई होय.
राणीच्या बागेत न्यायची हिंमत मात्र झाली नाही. मोजून १० प्रकारचे प्राणी पण तिथे
शिल्लक नाहीत.
शेवटच्या दिवशी, त्याच्या नातेवाईकांसाठी कापड खरेदीला गेलो होतो. तेव्हा दुकानदाराला नीट समजावले, आपल्या देशात जसे गरीब असतात तसा तो त्यांच्या देशातला गरीब आहे जे खरे ही होते. उगाच २-३ पट किंमत सांगू नकोस.
ह्यावरून एक आठवले, मी एकदा नवीन ओळख झालेल्या जर्मन मित्राला म्हटले, भारतात अनेक जर्मन कंपन्या आहेत आणि माझे काही नातेवाईक तिथे काम करतात. त्यावर तो म्हणाला, आमच्याकडे मात्र लोक कधी जर्मन कंपनी सोडून विप्रो, इंफोसिस मध्ये जायला मिळेल याची वाट पाहतात.