ऊकाराचा व होणे हे बरेच ठिकाणी दिसते. संस्कृत ऊकारांत शब्दांच्या विभक्त्यांमध्ये व येतो. (शब्द आता विस्मरणात गेल्याने उदाहरणे देता येत नाहीत. क्षमस्व.) काही ठिकाणी पेरूचे झाड याला पेरवीचे झाड असे म्हटलेले ऐकले आहे. माझी एक मैत्रीण समीकरणाच्या दोन्ही बाजवा असे म्हणत असे आणि मला ते चूक वाटत नसे.