आंतर = दोन/अनेक (समजातीय) गोष्टींमधले... जसे आंतरमहाविद्यालयीन नाटकस्पर्धा (मराठीत सांगायचे झाल्यास इंटरकॉलेज ड्रामा काँपिटिशन) म्हणजे दोन/अनेक महाविद्यालयांमध्ये होणारी नाटकस्पर्धा. किंवा आंतरजातीय विवाह.
अंतर् = एकाच गोष्टीच्या आतील... जसे अंतःप्रेरणा (एका/कीच्या आतील प्रेरणा. ह्याविरुद्ध, बाह्यप्रेरणा) किंवा अंतर्घर्षण (आतील घर्षण). (वाक्यात उपयोग - सामाजिक अंतर्घर्षणानेच समाज उत्क्रांत होत असतो आणि त्यासाठी अंतःप्रेरणा ही अत्यंत महत्त्वाची असते.)
अंतर् हा शब्द 'अंतः'चे संधी होतानाचे रूप आहेसे वाटते.
पण मग 'निः + पाप = निष्पाप'मध्ये ज्याप्रमाणे विसर्गाचा ष् होतो त्याप्रमाणे 'अंतः + प्रेरणा = अंतष्प्रेरणा' का होत नाही? प्रेरणेतील 'र' किंवा 'ण' मुळे काही होत असावे काय?