संस्कृत ऊकारांत शब्दांच्या विभक्त्यांमध्ये व येतो.
संस्कृत विभक्त्यांबद्दल माहीत नाही पण अपत्यार्थक रूपे शिकताना मूळ शब्दाच्या शेवटी उकार आल्यास पहिल्या शब्दाला दीर्घत्व प्राप्त होतं आणि शेवटच्या उकाराऐवजी 'अव' हे रूप येतं असं काहीसं शिकल्याचं आठवतंय. अपत्यार्थक रूप स्त्रीलिंगी करायचे असल्यास 'अवी' असं रूप होतं.
जसे 'मनू'वरून 'मानव' येतं, किंवा 'शंभू'वरून 'शांभवी'.
अजून काही -  'रघु'वरून 'राघव', 'मधु'वरून 'माधव', 'पुरु'वरून 'पौरव', इत्यादी...
एक शंका - 'अपत्य' हे 'अपति'चं अपत्यार्थक नाही ना? (उगाच आपलं वाटलं की ह्याच्या उत्तरातून आपल्या संस्कृतीवर काही प्रकाश वगैरे पडेल. ज्यांना बिनतोड वगैरे प्रतिवाद करायचा आहे त्यांनी खुशाल करावा.)