अगदी सहमत....

जरा विषयांतर करतोय पण श्री. मोडकांनी धुळे हा विषय काढलाच आहे म्हणून त्याबद्दल बोलण्यावाचून राहवत नाही. (कदाचित मी धुळेकर असल्यामुळे किंवा हा मनोगतवरचा माझा पाहिलाच प्रतिसाद असल्यामुळे असेल. असो.)

प्रे. संदिप पाटिल यांनी सांगितल्याप्रमाणे "कुणाल" चा चहाच्या चवीची आठवण लगेच झाली. मी जयहिंद महाविद्द्यालयात असताना अनेक विद्द्यार्थांना तिथे चहाचे फुरके मारत प्रयोगशाळेच्या प्रयोगवह्या पूर्ण करताना, महाविद्द्यालयातील प्राध्यापकांविषयी विनोद करताना, नवीन चित्रपटांचे बेत आखताना, सहलींचे प्रयोजन करताना, ईति. पाहिलेय.

खाण्याविषयी म्हणाल तर पारोळा रोडवरच कृषि महाविद्द्यालयापुढे "शांतीसागर" हॉटेलमध्ये जी चिकन हंडी मिळते त्यासारखी चिकन हंडीची चव मी तरी अजून अनुभवलेली नाही.

तसच "हॉटेल पंकज" (देवपुरात दत्तमंदीर चौकाच्या थोडं पुढे) ची शेव भाजी (जी माझ्या माहितीनुसार फक्त खान्देशातच मिळते) देखील खुप प्रसिद्ध आहे.