तुम्हा सर्वांचा कृतज्ञ आहे. कादंबरीविषयीचे तुमचे अभिप्रायही मौलीक आहेत. तेही जरूर कळवा. कादंबरीसंदर्भात चिकित्सक चर्चा अपेक्षित आहे मला.
मी प्रथितयश नाही. ही पहिलीच कृती आहे.
कादंबरीच्या प्रेरणेविषयी लिहिण्याची सूचना चांगली आहे. पण ती प्रक्रिया कितपत जमेल याची मला स्वतःला शंका आहे. एकप्रकारे त्या दिवसांचे पुन्हा जगणेच ठरते ते.