दीक्षितांनू,
एक नंबर झालीये कविता... च्च् च्च् च्च् एक नंबर झालाय लेख...
काय आहे, तुमच्या लिखाणाला प्रतिसाद द्यायचा तो 'कविता सुंदर आहे, मजा आली' असा काहीतरी. बोटांना ती सवयच जडली आहे जणू! त्यामुळे टंकायला सुरुवात झाली ती तशीच...
तुमच्यासारख्या कवि(वी?)माणसाचे (जसा बापमाणूस असतो तसा कविमाणूस) आमच्यासारख्या गद्य माणसाकडून ह्या विभागात हार्दिक स्वागत! ह्या वेगळ्या वाटेसाठी शुभेच्छा! 
थोडंसं चावट - मग तिच्यासारख्याच तिच्या मैत्रिणीही येतात... पण तशा सगळ्याच मुली (काही अपवाद सोडले तर) चांगल्याच असतात... तर त्या मुलींच्या तथाकथित चांगुलपणामुळे कवितारूपी कन्यारत्न जन्माला येतं... ब्बापरेऽऽऽ... काय विचार काय आहे?... हे कवितेच्या जगात चालून जाईल हो, पण प्रत्यक्षात असं काही नाही ना? 