लिहिलाय अनुभव!
मागे कवियत्री शांताताई शेळके यांचा एक अनुभव वाचनात आलेला. त्याची आठवण झाली. त्यांच्या एका मैत्रिणीकडे श्री. वि. स. खांडेकर आलेले. त्यांना भेटायला म्हणून या तिकडे गेल्या. त्यावेळेस उमेदवारी चालू होती शांताताईंची. यांनी खांडेकरांना कविता लेखनाबद्दल थोडे मार्गदर्शन मागितले. तेव्हा खांडेकरांच्या म्हणण्यानुसार, कविता लिहिताना एखादा विषय मनी धरून लिहायला सुरुवात केल्यास मनी आलेले शब्द, वाक्ये वहीत लिहून काढावे. एखादा शब्द नंतर न आवडल्यास त्यावर फक्त एक आडवी रेघ मारावी, जेणेकरून आपणास तो शब्द नंतरसुद्धा दिसू शकेल. शेवटी जेव्हा कविता पूर्ण होते तेव्हा तुम्हास कवितेच्या जन्माची संपूर्ण कहाणी तुमच्या वहीत लिहिलेली आढळेल. त्याकडे बघणे हा एक निराळाच आनंद आहे. पुन्हा याचा कधी कधी असा अनुभव येईल की दुसऱ्या एखाद्या कवितेची बिजे त्यात आढळून येतील. पुढे काही कविता लिहून झाल्यावर तुमच्या विचारप्रक्रियेत झालेला चांगला बदल तुम्हास बघता येईल, ज्याचा पुढे उपयोग होईल.
आता आपणांस तसाच अनुभव येईल असे म्हणणे अवघड आहे कारण सांगणारे खांडेकर अन् ऐकणाऱ्या शांताताई!!
पण या अनुभवाची आठवण करून दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार.
मुद्दा वृत्ताचाच असेल असं नाही, कधी कधी भावाचा मुद्दा पण असतो. अशा वेळी शब्द बरोब्बर भाव खातात. तर हे 'निगोसिएशन' यशस्वी झालं की मग कुठे त्या कवितेची एखादी ओळ लिहिली जाते. जणू काही मन आणि शब्दांनी करारावर सह्याच केल्या आहेत.
मस्त! लेख खूप छान झालाय. पु.ले.शु.