जमल्यास स्वतंत्र कल्पनेवर आधारित रचना करण्याचा प्रयत्न केल्यास अधिक छान वाटेल.
चित्तोपंत,
अहो, आमचा लेखनाचा मर्यादित वकूब, त्याचा परिघ तसेच त्याच्या मर्यादा या साऱ्याची इत्थंभूत माहिती असूनही तुम्ही ही मागणी करावी? गदिमांच्या शब्दांत सांगायचे तर, "मरणोन्मुख त्याला का रे मारिसी पुन्हा रघुनाथा? " (दोस्ती-खात्यात काय काय करावे लागते, नाही?). असो. तुमच्या शब्दाला मान देऊन एक स्वतंत्र द्विपदी देत आहे. फूल ना फुलाची पाकळी समजून गोड मानून घ्यावी.
खांद्यावरी कुणाच्या बंदूक कोण ठेवी
ओढून चाप कोणी तिसराच आग लावे...