कुशाग्र,
लेख वाचला, वाचतांना डोळे भरून आले हे वेगळे सांगायला नको. या सर्वातून जाण्याची शक्ती प्रणवच्या आईला देवाने कशी दिली ते देवच जाणो....माझ्या मुलाच्या वेळी (ज्याचे नाव योगायोगाने प्रणवच आहे) सुद्धा अशाप्रकारची गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता इथे सांगितली होती..मूल जगणार नाही/ जगले तर दोष असेल मग शस्त्रक्रीया.../ मतिमंद असू शकेल असे आम्हाला सांगितले होते. पहिल्या मुलीच्या वेळी नाकात घशात नळ्या/ कृत्रिम श्वासोश्वास, तापमान नियंत्रक या सर्वाचा अनुभव आम्ही घेतला होता.. सुदैवाने ती त्यातून बाहेर आली. म्हणून दुसऱ्या वेळी निदान कोवळ्या जिवाला संकटात टाकण्याऐवजी आम्ही मला सातवा सुरू असतांना भारतात जाण्याचा निर्णय घेतला..जे होईल ती परमेश्वरी इच्छा असे ठरवले . अशा केसेमध्ये भारत आणि अमेरिकेत उपचार पद्धती निराळी आहे असा अनुभव आहे.
अर्थात हे प्रत्येकाला आणि दरवेळी शक्य होईल असे सुद्धा नाही. देवाच्या कृपेने प्रणव आज इतर निरोगी मुलांप्रमाणे आहे. पण गर्भारपणात एक एक दिवस, त्याच्या जन्मानंतर सुरुवातीचा एक क्षण , मिनिट ,एक तास एक कसा घालवला याचा हिशोब आजही आहे... मी अजूनही धक्क्यातून सावरले नाही. घरात जन्म घेणारे मूल ही आनंदाची घटना असते. पण ते घडणे सुद्धा किती अशक्य कोटीतली गोष्ट आहे असे अशा अनुभवानंतर वाटू लागते. आपल्या सर्वावर कशी परिस्थिती ओढवली ते मी नक्की समजू शकते... आमच्या सदिच्छा पाठिशी आहेत.
सोनाली