त्याचे शरीर घेऊन पुढे काय करावयाचे कोठे करावयाचे, याचा विचार सुरू झाला. आमच्याजवळपासचे सर्वच भारतीय आमच्यासारखेच या प्रकारास अनभिज्ञ होते. आमच्या परिचयाचे एक डॉक्टर येथेच फिलाडेल्फियातच गेली दहा पंधरा वर्षे स्थायिक होते त्यामुळे त्याना माहिती असेल म्हणून फोन केला पण त्यानीही या बाबतीत आपणही तेवढेच अनभिज्ञ आहोत असे सांगितले. काही हिंदू मंदिरांच्या व्यवस्थापनाकडे चौकशी केली पण त्यांच्याकडे या प्रकारची व्यवस्था नाही असे कळले.
हा विचारही कधी केलेला नव्हता. आता भारतीयांची इकडे दुसरी तिसरी पिढी आहे. पूर्वकिनाऱ्यावर तर आणखीही जुनी परंपरा असेल. अर्थात उगाच वेळ आलेली नसताना कोण कशाला ही माहिती करून घेणार हेही आहे. इथल्या सांस्कृतिक मंडळात (उदा. महाराष्ट्र मंडळ , भारतीय लोकांचे मंडळ , देवळे वगैरे ) काही माहिती असेल असे वाटले होते पण आता तुम्ही सांगितल्यावर तीही नसावी असे दिसते.
-मेन