प्रतिसाद देणाऱ्या सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार...
खरं तर कवितेत ` आशयबाह्य नखरे ` असू नयेत, अशाच ठाम मताचा मी आहे... पण या कवितेचा एकंदर विषय पाहता ही कविता माझ्याच या मताला अपवाद ठरवावीशी मला वाटली आणि मी तीत विषयाला साजेसे रंग भरण्याचा प्रयत्न केला. इथे विषयाकडून आशयावर मात झाली!!!
एखादा सन्माननीय अपवाद वगळता बहुतेकांना हे भरलेले रंग आवडले.
या रंगांमुळे ज्यांची गैरसोय झाली, त्यांची क्षमा यापूर्वीच मागितली आहे.
आता, ज्यांना हे रंग (आणि कवितेतीलही जे काही विटकेचिटके रंग असतील ते )आवडले आहेत, त्यांचे मनापासून आभार मानण्यासाठी हा प्रति-प्रतिसाद. :)
लोभ आहेच; असाच राहू द्यावा....