प्रेम शोधत आजही तो हिंडतो
कोण आहे हा शहाणा पाहुया
सांगेल सारे एकदाचे आज ती
काय घाली ती उखाणा पाहुया!
हे शेर फारच सुरेख जमले आहेत.
पण वृत्ताकडे जरा लक्ष द्या की राव!
उदा. ही ओळ 'कुणी दाता भेटतो का पाहुया '
भेटतो दाता कुणी का पाहुया अशी केली तर वृत्तात बसते. जरासे कष्ट पडले तरीही चांगल्या सवयी नेहमी अंगवळणी पाडून घ्याव्यात. एकदा सवय झाली की कष्ट उरत नाहीत पण सौंदर्य मात्र दृष्ट लागण्याजोगे प्राप्त होते असा अनुभव आहे
रचना बेहद्द आवडल्या... लिहीत रहा