बंडूला कळवले आणि हे संकेतस्थळदेखील दाखवले. आवडले. वैशिष्ठ्यपूर्ण मराठी शिकण्याची त्याची इच्छा आहे पण सध्या संशोधनाच्या निमित्ताने कामकरी आणि कातकरी लोकांत महिन्यातले २० दिवस त्याचा वावर असतो. तिथे त्याला अगदी जिवंत मराठी शिकायला मिळते आहे. त्याचे केवळ मराठी भाषेवरच प्रेम आहे असे नाही. त्याची मैत्रीणही मराठी आहे.
अवांतर :
ह्या वैशिष्ठ्यपूर्ण मराठीचे माहीत नाही पण इंग्लडात गेल्यावर बंडू इंग्रजी बोलता-बोलता मध्येच मराठी शब्दसमूह('यू डिड इट', 'यू कनडूइट', 'दॅट्सइट', 'होली काउ' सारखे 'जिंकलंस रे मित्रा', 'कुठे होतास इतके दिवस', 'पाय कुठे आहेत') किंवा मराठी शब्द ('वॉव', 'ग्रेट' ऐवजी 'वाव्वा' वगैरे) बोलण्यात घुसडेल तेव्हा साहेबावर सूड उगवल्याचे समाधान मिळेल.