जगभर पसरलेल्या आमच्या प्रिय मराठी बंधूभगिनीनो, ‘योग’ याविषयी उत्कंठा सर्वांना असतेच .. यासाठीच हे संकेतस्थळ तयार केले गेले आहे.
‘योग ’ हा शब्द संस्कृत मधील युज या धातु (क्रियापद) गण ४ आत्मनेपद पासून झालेला आहे. त्याचा अर्थ जोडणे, विलीन होणे असा आहे. योग या शब्दाचे आणखी कितीतरी अर्थ सांगितले जातात, आपण मात्र त्याचा अर्थ ‘स्वत:ला ईश्वरात विलीन करणे ’ असाच करतो आहोत.
‘तुम्ही जगता कशासाठी ? ’ या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर क्वचितच
कोणी देऊ शकतात. बहुतेक लोक विचारातच पडतात . पण आपण एवढे मात्र लक्षात
घ्या ! की आपले जीवन हा केवळ योगायोग नव्हे. अजून वाचा.