आपण ह्या प्रयोगालाही आवर्जून हजेरी लावलीत, पाठ थोपटून मार्गदर्शन केलंत-- भरून पावलो !

द्विपदींमध्ये पदोपदी वृत्त-व्यभिचार झाला आहे हे जाणवलं, क्षमस्व ! अपेक्षित सुधारणांकरता नक्कीच प्रयत्न करेन.

'मनोगत' हे माझ्याकरता एखाद्या कार्यशाळेसारखं आहे, जिथे रसिक आणि जाणकार आस्वादक -समीक्षक- प्रतिसादकांच्या सहभागामुळे मला बरंच शिकायला मिळतंय. त्याचा मी कितपत उपयोग करून घेऊ शकेन, हा भाग वेगळा.

आपण सर्वांनी वेळ देऊन ह्या प्रयत्नाला प्रोत्साहन दिलेत, मनःपूर्वक आभार !