मी सध्या महाराष्ट्राची राजधानी आणि परिसराबद्दल सांगतो आहे. मराठी प्रतिशब्दांची गोष्ट तर दूरच राहिली पण बहुतेक सर्व संस्थांमध्ये मराठीचा पर्यायच नाही (आयव्हीआर ) . वारंवार सूचना करूनही काहीच प्रतिसाद दिला जात नाही.(उदा. वोडाफोन ). महा. टेली. , रेल्वे सारख्या केंद्र सरकारी आस्थापनांमध्ये तर बळजबरी हिंदीचा घाट घातला जातो. (उदा, लोकल च्या नवीन डब्यात , स्थानकांवरील नवीन सूचना दोनच भाषांत सूचना आहेत (आधी मराठीचा ही समावेश होता) . पुण्यातही मोबा. कंपन्या आपले संदेश रोमन मधून हिंदी भाषेत पाठवतात. यात दुसरीही बाजू आहे एकदा का तुम्ही हिंदीत संवाद करणे सुरू केले की अशा ठिकाणी नोकऱ्यांत ज्यांची भाषा हिंदी आहे त्यांनाच प्राधान्य मिळते कारण तो जास्त चांगले हिंदी बोलू शकतो. अशा प्रकारे ह्याचे परिणाम दूरगामी आहेत.

एकंदरीतच सर्व प्रकारे मराठीत व्यवहार करणे अवघड किंवा अशक्य झाले आहे. दुर्दैवाने बहुतांश मराठी लोक याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतात /आग्रही नाहीत उलट अशी विचारणा करणाऱ्यास संकुचित / दुराग्रही समजले जाते.  तथाकथित सौजन्या पायी आपण आपल्याच पायावर वार करतो आहे.