अखेर रामदासबुवांनी त्याला झापलंच. "तुमच्या कीर्तनात व्यत्यय तर येत नाहीये ना? छातीचा खोका झाला, तर माझ्या होईल. तुम्हाला काय करायचंय? ' स्वभावाप्रमाणं आगाऊपणानंच त्यानं बुवांना विचारलं.

आचार्य अत्र्यांच्या बुवा तेथे बाया नावाच्या नाटकात असाच थोडासा एक प्रसंग आहे. बुवांचे कीर्तन चालू असताना घरातला एक तरुण तेथेच सिगारेट ओढतो (त्याला ह्या बुवाबाजीवर विश्वास नसतो) त्याला नंतर दुसरा एक श्रद्धाळू  रागावून म्हणतो, "अरे बाबांचं प्रवचन चालू असताना तू सिगारेट पेटवलीस.?? "

त्यावर तो तरुण म्हणतो, "नशीब समजा बाबांनाच नाही पेटवलं"

पुढे तो विचारतो, "अरे मग आम्ही तरुणांनी ओढायचं तरी काय? "

त्यावर ते गृहस्थ म्हणतात, "नामस्मरणाची जपमाळ ओढा!"

असो.

आपला लेख चांगला अहे. मात्र फार त्रोटक वाटतो.  शैली आवडली.

-श्री. सर. (दोन्ही)