गझल आवडली. 'बंगले' खास.
एक रस्त्याच्या कडेला फूल खोकत बोलले, "या -
माणसांचा फार आता वाढला उच्छाद आहे! "
- "या" हा इथे स्वागतार्थी 'या' नसून 'ह्या' ऐवजी वापरण्यात येणारा 'या' असावा असे वाटते. तसे असल्यास या द्विपदीत 'ह्या' वापरले असते तर बरे झाले असते. एरवी फरक पडत नसला तरी इथे वाक्य तोडल्यामुळे गैसमजास वाव आहे. उगीच "या, बसा. काय सांगू तुम्हाला, माणसांचा हल्ली फार उच्छाद वाढला आहे" असाही अर्थ काढला जाऊ शकतो. अर्थात कवीस तोच अर्थ अभिप्रेत असल्यास ही टिप्पणी बाद ठरते.