काही सुधारणा करून शेवटचे ३ शेर पुन्हा -

एक रस्त्याच्या कडेला फूल खोकत बोलले, "ह्या -
माणसांचा फार आता वाढला उच्छाद आहे! "

बंगले बांधा तुम्ही पण झोपड्यांमध्येच का रे?
... बापजाद्या दौलतीचा केवढा उन्माद आहे

देवधर्माने जगी होतेच की काही भले, पण -
कोणते नियमीत होते कोणता अपवाद आहे?